शिंदखेडा :- आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभेचे नेते, आजी माजी सैनिकांची व अर्ध सैनिक बलांची बुलंद तोफ,आंदोलन प्रमुख मा. नामदेव येळवे (आप्पासाहेब), विधी कायदा सल्लागार ॲड. गणेश सोनवणे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे, धुळे तालुका अध्यक्ष प्रा.संदीप तवर,कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी, हेमंत जाधव सोनवणे, सरपंच प्रकाश चव्हाण संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, कमलेश मगरे,नंदुरबार संपर्कप्रमुख महेंद्र निकम, अशोक काकुळदे, शरद नवसारे यांच्या मार्गदर्शनाने सोमवार दिनांक १७/१/२०२२ रोजी मा. आदिवासी प्रकल्प अधिकारी धुळे, यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात धुळे जिल्ह्यातील कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर या आदिवासींचे खावटीचे फार्म अपडेट करून त्यांना ॲप्रोवल देऊन दुसऱ्या टप्प्यातील खावटी किटचे लवकरात लवकर वाटप करावे व प्रांताधिकारी कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालयात ४७ आदिवासी जमाती यादी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. खावटी अनुदान योजनेतील उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना अपडेट करून प्रकल्प स्तरावरून मंजुरी देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील इतर आदिवासी जमातीच्या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी देऊन खावटी वाटप करण्याचे आदेश दिले आहेत आणि किट वाटपाचे कामही सुरू झाले आहे. परंतु कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर या आदिवासींसाठी आदेश दिलेले नाहीत.या आदिवासींची खावटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्या लाभार्थ्या कडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र नाही.त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ग्रामसेवक/तलाठी/सरपंच यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुसूचित जमातीचा तत्सम पुरावा इत्यादी स्कॅन करून खावटी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत आदेश दिलेले असताना देखील आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असताना देखील या आदिवासींना खावटी योजनेपासून वंचित ठेवण्याचे महाषड्यंत्र सुरू आहे.
इतर आदिवासींना याच कागद पत्रावरच ॲप्रोवल दिलेले आहेत. तर कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर या आदिवासींना, हेतुपुरस्सर व्हेरिफाय कास्ट सर्टिफिकेट असा शेरा देऊन पेंडिंग ठेवण्यात येत आहे. ताबडतोब पेंडिंगचा शेरा काढून त्यांना ॲप्रोवल देण्यात यावे व खावटी अनुदान लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारचे निवेदन आदिवासी विकास संघाच्यावतीने सादर करण्यात आले. यावेळी सुरेश वाघ, किरण कोळी, नंदू महाराज, मधुकर सोनवणे, रवींद्र कोळी, शालिग्राम शिरसाट, दिलीप शिरसाट, राकेश शिरसाट, अभिमन्यू शिरसाट, संजय सोनवणे, परशुराम जाधव, रमेश कोळी, नितीन कोळी, पृथ्वीराज शिरसाट, मनीषा कोळी, विजयाबाई सोनवणे, बेबीबाई चव्हाण,कल्याण तालुका कर्मचारी हेमंत जाधव सोनवणे सुटला आहे देवकाबाई सोनवणे, इंदुबाई सोनवणे, रमाबाई चव्हाण, कमलबाई चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

