shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपरगाव तहसील कार्यालयात चाललेल्या महाभ्रष्टाचाराचे भांडाफोड करण्यासाठी करणार आंदोलन- संजय काळे.

सत्याग्रह शोध एकवीस कोटी रूपये दंडाचा

कोपरगाव । कोपरगाव तालुक्यातील देर्ड चांदवड व डाऊच शिवारात समृध्दी महामार्गा साठी माती व मुरूम उतखनना साठी परवानगी पेक्षा अतिरिक्त उतखनन केले म्हणून मंडळाधिकारी पोहेगाव यांनी दिनांक १४/२/२०२० रोजी पंचनामे केलेत.

ह्या पंचनाम्याचे आधारे तहसिलदार कोपरगाव यांनी ठेकेदार गायत्री प्रोजेक्ट व दिलीप बिल्डीकॉन यांना एकूण रूपये २१ कोटींचा दंड दिनांक ५/३/२०२० रोजी ठोठावला.

दिनांक १/१०/२०२१ रोजी माहीतीच्या अधिकारात तहसिलदार कोपरगाव यांना दंड वसूली बाबतचे दस्त मागितले.. अथवा माफ केल्याचे दस्त मागितले.. तसेच मंडळाधिकारी पोहेगाव यांना १४/२/२०२० च्या पंचनाम्याच्या प्रती मागितल्या.. आज चार महिने उलटले पण माहिती कुणीच देत नसल्याचे संजय काळे यांनी म्हटले आहे..!

दि.१९/०१ २०२१ रोजी तहसिलदार कार्यालयाचा शिपाई १७/१२/२०२१ चे पत्र संजय काळे यांच्या घरी देऊन गेला .. सदर पत्रात नायब तहसिलदार लिहितात दंडाचे दस्त अभिलेखात आढळ होत नाही..!
 public records act 1993 प्रमाणे दस्त आढळ होत नाही म्हणणे म्हणजे दखल पात्र फौजदारी गुन्हा आहे.. !शासनाच्या तिजोरीत जाणारे २१ कोटी रूपयांचे दस्त सापडत नाहीत याचाच अर्थ महसूलच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने, कटाने २१ कोटी रूपयांचे परस्पर अपहरण तर केलेले नाही ना..?

सदर २१ कोटी रूपये दंडाच्या शोधासाठी मी सोमवार दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजे पासून एक वाजे पर्यंत तहसिल कार्यालयाचे पोर्च मध्ये "शोध रूपये २१ कोटी दंडाचा" हा फलक लावून एकटाच उभा राहणार आहे.
दंड वसूल झाला नसल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत..
सामाजिक कार्यकर्ते
संजय भास्करराव काळे.

close