कार्यकर्त्याच्या आठ महिन्याच्या मुलाला पाहून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना अश्रू अनावर....
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मस्तूद कुटुंबीयांना दिली
सांत्वनपर भेट...
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका जवळील गणेश नगर येथील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते परिमल मस्तुद यांचे दोन दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर ती डाळज जवळ अपघाती निधन झाले.
परिमल मस्तूद यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन भेट घेण्याकरिता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिनांक २० रोजी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. निवासस्थाने मस्तूद कुटुंबीयांची भेट घेत असताना अचानक कै. परीमल मस्तूद यांचा आठ महिन्याचा मुलगा रांगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जवळ आला.यावेळी भरणे यांनी त्यास उचलून मांडीवरती घेतले व याच वेळी भरणे यांना अश्रू अनावर झाले व त्यांना रडू कोसळले.
स्वता: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे रडत असताना यावेळी निवासस्थानात शांतता पसरली, व उपस्थित कार्यकर्तेही भावूक झाले.अशा या हळव्या मनाचा राज्यमंत्री उपस्थितांनी पहिल्यांदाच अनुभवला...

