shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड;उपाध्यक्ष विष्णू वाघ,सेक्रेटरी बाळासाहेब आगे खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची निवड..!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :- 
येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भांड यांची प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी तर, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ,सेक्रेटरीपदी बाळासाहेब आगे, खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली.
येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात या निवडी करण्यात आल्या. प्रेस क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. शंकरराव आगे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

               बाळासाहेब भांड

                विष्णु वाघ

बैठकीत अध्यक्षपदी बाळासाहेब भांड यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत शिवाजी पवार, बद्रीनारायण वढणे,अनिल पांडे, करण नवले, विकास अंत्रे यांची निवड करण्यात आली.

                  बाळासाहेब आगे


              प्रकाश कुलथे

यावेळी प्रथम बाळासाहेब भांड यांनी प्रेस क्लबच्या कामकाजाविषयी माहिती विषद केली. बाळासाहेब आगे यांनी जमाखर्चाचे सविस्तर विवेचन केले.रमेश कोठारी,पद्माकर शिंपी, राजेंद्र बोरसे,नवनाथ कुताळ, मनोज आगे, सुनील नवले, विवेक लोहकणे,महेश माळवे,रवी भागवत,गौरव साळुंखे आदी उपस्थित होते. शेवटी अनिल पांडे यांनी आभार मानले.
close