shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा पहिला वर्धापनदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

अहमदनगर । प्रतिनिधी :-
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचा पहिला वर्धापनदिन व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी 2022 रोजी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी पिंपळवाडी ता राहाता येथील ग्रामीण भागातील वीटभट्टी कामगारांना जीवनावश्यक वस्तू ,लहान मुलांना क्रीम बिस्कीट, मिठाई व कामगार महिलांना साडीचे वाटप अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचे अध्यक्ष तथा विश्वस्त, जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे , शिर्डी शहर अध्यक्ष दीपक चौधरी, जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख श्री शशिकांत महाले, जेष्ठ मार्गदर्शक श्री यशवंतराव वाघचौरे, जिल्हा निरीक्षक विश्वस्त व खजिनदार श्री बद्रिनाथ लोखंडे व सौ रोहिणी लोखंडे हे उपस्थित होते तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल श्री जुबेरभाई शेख, व राहाता तालुका अध्यक्ष श्री राकेश दादा भोकरे , शिर्डी शहर अध्यक्ष श्री हृषिकेश कुरकुटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे, आपल्या सर्व अहमदनगर जिल्ह्यातील समाज बांधवांनी हा उत्सव मोठ्या प्रमाणात यापुढे साजरा करावयाचा आहे तसेच कामगार मुलांना शिक्षणाची सोय व्हावी याकरिता ग्रामीण भागात कामगार शाळा स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून फिरती शाळा लवकरच अस्तित्वात आणू त्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे असे आवाहन श्री बद्रिनाथ लोखंडे यांनी सर्व समाज बांधवांना केले आहे.
close