shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथे तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू


 प्रतिनिधी : आसावरी वायकर

गुंडेगाव : २ /  नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे केंद्र शासनाच्या वतीने शुढ्ळेश्वर प्रोड्युसर कंपनी लि.च्या वतीने नाफेड व महा.एसपीसी. लि.पुणे अंतर्गत तुरीचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाले असून दि.२५ डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. 

        शुढ्ळेश्वर प्रोड्युसर गुंडेगाव येथील केंद्रात नाफेडच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे एफएक्सू दर्जाची तुर खरेदी केली जाणार असून, या खरेदी केंद्रावर जे शेतकरी ऑनलाईन नोंदणी करतील, त्याच्या तुरीला प्रति क्विंटल ६००० हजार ३०० रुपये हमीभाव मिळणार आहे. नोंदणी झालेल्या शेतकर्याना एसएमएस द्वारे खरेदी केंद्रावर माल आणण्यासाठी कळविण्यात येणार आहे. 

    सदरचा माल एफ.ए.क्यु प्रतीचा असल्याची खात्री झाल्यानंतर त्या मालाची इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजणी करण्यात येणार आहे. नगर तालुका व गुंडेगाव परीसरातील शेतकर्यानी तुरीची ऑनलाईन नोंदणी करुन या आधारभूत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शुढ्ळेश्वर प्रोड्युसर केंद्राचे संचालक संभाजी जाधव, विठ्ठल माने  यांनी केले आहे.
close