shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीष पट्टेद यांचे पगार रोखले ; .मनमानी करणाऱ्या मुख्याध्यापकाला चाप

प्रतिनिधी : संजय वायकर

अक्कलकोट : २ /
केएलई सोसायटी संचलित मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीष पट्टेद यांनी शासन नियमावलीच्या विरुद्ध जाऊन मनमानी कारभार केल्याबद्दल त्यांचे वेतन रोखण्याचे लेखी आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी आज दिले .


जेष्ठ शिक्षक एस.वाय हरवाळकर यांच्या बेकायदेशीर निलंबन प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे.

 कर्मचारी सेवाशर्थी नियमावली आणि शिक्षणाधिकारी,सोलापूर यांच्या आदेशाचे पालन न केल्याने जावक क्रमांक जिपसो/माध्यमिक
१३३९३ दि . ३० डिसेंबर २०२१ च्या पत्राने हा आदेश काढला आहे.शासनाची परवानगी न घेता हरवाळकर सर यांचे निलंबन करून शासनाकडून त्यांना वेतन अदा केले.निलंबन काळातील वेतन संस्था देणे बंधनकारक असताना या सर्व नियमाचा जाणीवपूर्वक भंग केला. शिवाय शिक्षणाधिकारी यांनी हरवाळकर यांना सेवेत तातडीने दोन वेळा पुनर्स्थापित करण्याचे आदेश देवूनही आपला मनमानी कायदा चालूच ठेवला.त्यामुळे संस्था व मुख्याध्यापक पट्टद यांना सात ते आठ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.या फसवणूक प्रकरणी ४२० चा फौजदारी(फसवणुकीचा)
आणि नियमबाह्य आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी मुख्याध्यापक व संस्था चालकांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल होणार असून गिरीष पट्टेद, प्रशांत कोल्हे या दोन मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारामुळे संस्था भविष्यात फार मोठया संकटात सापडणार असल्याचे शिक्षक कायद्याचे अभ्यासक म.एजाज कनूल सर यांनी सांगितले .
  
close