shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिराढोण येथे रस्तेलुटारुने गीलवरीने केला डोळा निकामी ; नगर सोलापूर रस्त्यावरील रस्ता लुटमार कधी थांबणार... ?

प्रतिनिधी : आसावरी वायकर

शिराढोण : २ /  गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग नगर सोलापूर रस्त्यावर छोट्या मोठ्या रस्ता लुट मारीच्या घटना घडत आहेत.

नगर तालुक्यातील नगर सोलापूर रस्त्यांची काही हद्द भिंगार कॅम्प पोलिसांची हद्दीत तर वाळुंज शिवारा पासून नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्द येथे दि.२७ डिसेंबर रोजी आपल्या कामानिमित्त आपल्या चार चाकी बोलेरो वाहनाने नगर येथुन आपल्या गावाकडे परतत असताना शिराढोण येथील सिनानदी  वरील पुलाजवळ रात्री साधारपणे १० च्या सुमारास तिनं ते चार दरोडेखोराकडून गाडी अडवून रोख रक्कम २५ ते ३० हजार रक्कम व काही मौल्यवान वस्तू बळजबरीने हिसकावून घेतल्या व या गाडी चालकांच्या शेजारी बसलेले गोरख आनंद शिंदे (वय ३८) राहणार थेरगाव ता.कर्जत यांनी आपल्या जवळच्या वस्तू व पैसे देण्यास नकार देताच जवळ येऊन गीलवरीच्या साह्याने त्यांच्या डोळ्यांवर हल्ला केला. यांत गोरख शिंदे यांचा डोळा पुर्ण निकामी झाला. इतर सोबत असणारे मित्रांना हाणमार झाली आहे.

हल्लेखोरांच्या हल्यात जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती जखमी प्रवासी यांनी कळवली आहे.
 सदर रस्ते दरोडेखोरा पैकी एक दरोडेखोरांना मोठ्या धाडसाने पकडुन नगर तालुका पोलिसांच्या स्वाधिन केले होते. व गुन्हा दाखल करण्याची विनंती केली .

 परंतु नगर तालुका पोलिस स्टेशनच्या काही कर्तबगार पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित रस्ता लुटमारकडे थातुरमातुर चौकशी करून गुन्हा दाखल न करू घेताच सदर आरोपीला सोडून दिल्याने नागरीकात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
 हल्ल्यात जखमी रुग्णांनी पोलिसांच्या भुमीकेवर संशय व्यक्त केला आहे.

तरी या प्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करुन न घेतला जेव्हा पेशंट जबाब देईल तेव्हा गुन्हा दाखल करू असे उत्तर देऊन संबंध पोलिस कर्मचार्यांनी संबंधितांना काढून दिले.  इतर दरोडेखोर फरार आहेत.

चौकट

सदर हाॅस्पिटल मध्ये कर्मचारी पाठवले होते. रुग्ण बेशुद्ध असल्याने जबाब घेण्यास उशिरा झाला शुध्दिवर आल्यावर जबब नोंदुन गुन्हा दाखल करण्यात येईल संबंधितांना अटक केले जाईल.
     राजेंद्र सानप , सा.पोलिस निरीक्षक
नगर तालुका पोलिस स्टेशन
close