प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
पर्यावरण संवर्धन व विकास ही जागतीक गरज निर्माण झालेली असून या साठी महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरणवादी विविध संघटनांना सोबत घेवून बीड जिल्हयात पर्यावरण पोषक कार्य करायचे आहे.
या साठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे संघटन करून पर्यावरण संवर्धन चळवळ वाढवावयाची आहे.या चळवळीमुळे भारत देशातील जनतेचे आयुर्मान नक्कीच वाढेल.
या साठी जिल्हास्तर,तालुकास्तर व गाव स्तरावर विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करावयाच्या आहेत.
तरी पर्यावरण संवर्धन व विकास समिती मध्ये कार्य करण्यास ईच्छूक महिला,पुरूष,तरूण,तरूणी यांनी आपला बायोडाटा,या क्षेत्रातील कार्याचा अहवाल व विनंती अर्ज 9096688365 या वाट्सप नंबर वर पाठवावेत.
आपले कार्य व पात्रात पाहून योग्य पद व सन्मान देवून या कार्यात सोबत घेतले जाईल
असे आवाहन प्रा.ईश्वर मुंडे नव नियुक्त जिल्हाध्यक्ष,पर्यावरण संवर्धन व विकास समिती,जिल्हा बीड यांनी केले आहे.

