shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथील घटनेची पुनरावृत्ती संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस करणार काय?

एकीकडे महा विकास आघाडीची सर्व नेते मंडळी ओबीसीआरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय कुठलीही निवडणूक होणार नाही असे ठणकावून सांगत आहेत. माञ शिर्डी येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी 4 प्रभागांसाठी दि. 03/01/2022रोजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पञ भरले आहेत.

काँग्रेस पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रात धूळधाण उडालेली असताना, ओबीसीआरक्षणाच्या मुद्दयावर संपूर्ण ओबीसी समाज आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलने करीत आहे. शिर्डीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला असताना, फक्त काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या 4 प्रभागांसाठी फाँर्म भरले आहेत.जर चारही प्रभागांमध्ये ओबीसींना प्राधान्य दिले असते तर मान्य आहे, माञ ती मानसिकता काँग्रेसजनांची कधीही नव्हती आणि आजही नाही. तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक 5 आणि 8 मध्ये 99%मतदार हा अनुसूचित जमातीचा आहे. 

काँग्रेसने त्यांनाही उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्यावरही मोठा अन्याय झाला आहे. याउलट प्रभाग क्रमांक 10 आणि 14 मध्ये मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदार आहे. या दोन्ही प्रभागांमध्येही ओबीसी उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशन जरी अपक्ष भरलेले असले तरी यामागे वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याचा दाट संशय मला आहे. दि. 04/01/2022 रोजी अर्जांची छाननी आणि दि. 10/01/2022रोजी माघार आहे. तर दि. 18/01/2022रोजी मतदान आहे. शिर्डी येथील घटनेतुन एकंदर असं प्रतीत होत आहे की प्रत्यक्ष निवडणुक न लढता ओबीसी आणि अनुसूचित जमाती च्या जागांवर आयता ताव मारायची संधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोडायची नाही.कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात याची पुनरावृत्ती होऊ शकते. माञ यामुळे ओबीसी समाजाच्या मोठया रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे, हे काँग्रेस वासीयांनी विसरू नये. किंबहुना काँग्रेस पक्षाला येणाऱ्या भविष्य काळात याची चोख किंमत मोजावी लागणार..... - सचिन भैरवकर (उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस -भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा)
close