shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांची अ.नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती ;

नगर ग्रामीणच्या पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

  प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : २  /  नगर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यात विविध ठिकाणी काम केलेले, संवेदनशील पोलिस स्टेशन नेवासा,कोपर्डी व जवखेडे तिहेरी हत्याकांडसह विविध संवेदनशील प्रकरणाचा तपास पथकात असलेले डॉ. शरद गोर्डे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर विभागात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

त्यांनी मंगळवारी, दि. २८ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला .नगर येथील रिक्त पदावर गोर्डे यांना संधी मिळाली आहे.डॉ.शरद गोर्डे यांची लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याने दक्ष पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे, शारदा कुलकर्णी,  रफीक शेख, पत्रकार शिवा म्हस्के, पत्रकार सबिल सय्यद, पत्रकार संजय वायकर यांनी गुलाब वृक्ष देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
close