shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव शहरात सेवानिवृत्त सैनिकांवर नागरीकांनी केला फुलांचा वर्षाव..!!

सेनगाव/विश्वनाथ देशमुख:  सेनगाव शहरातील सुपुत्र राम वाणी हे भारतीय सैन्य दलात भारतमातेचे रक्षण करत होते. त्यांनी सैन्यदलात प्राणांची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचं २६ वर्ष रक्षण केले. ते आज भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परत आले.दि.६ जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता सेनगाव शहरातील नागरिकांनी या सेवानिवृत्त भारतीय सैनिकांचा पत्नीसह फुलांचा वर्षाव करत वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला.



देशसेवा बजावुन निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती नागरीकांच्या सन्मानाने फुलून आली.या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले.भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.अशा सैनिकांचा ग्रामस्थांना अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा,या हेतूने सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते. यावेळी गावातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. भारत माता की जय असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही जंगी मिरवणूक निघाली. गावात ध्वज पताका ही लावण्यात आल्या. मिरवणूकीत देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.

close