shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुहागशाह आणि गोपाळराव वेंकुशाह..!



साईनाथांच्या आज्ञेनुसार दासगणू महाराज साईनाथांचे गुरू
(साईनाथांच्या भाषेत छद्मनाभ भेंकुश- पद्मनाभ वेंकुशाह)
श्री गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे सेलूतील मुळ स्थानी गेले. जसं शंकर भट्टांस श्रीपादांनी पिठापुरास पाठवले. डोळ्यांनी पहा, माझ्या माणसांना भेट, त्यांच्या कडून माझ्या बद्दल, माझ्या लीलांबद्दल ऐक, माझ्या संबंधित, माझ्या वास्तव्याच्या सर्व जागा पहा. नंतर परत माझ्या कडे ये आणि मग माझं चरित्र लिहा.. 

यानुसार दासगणू महाराजांनी वेंकुशाह यांचे २३७ ओव्या असलेलं चरित्र आरती सह लिहिले. यातील टर्निंग पॉइंट म्हणजे वेंकुशाह व सुहागशहा यांची अहमदाबादेतील प्रसंग.
भारत भ्रमणात असताना वेंकुशाह अहमदाबादेत सुहागशहांच्या समाधीस्थळी गेले तेव्हा समाधीस अष्टसात्विक भाव उमलून समाधीस घाम फुटला व सुहागशहांनी वेंकुशाहांना अलख निरंजन केला व सांगितले की तुम्ही पुर्वजन्मीचे रामानंद आहात व तुमचा शिष्य कबीर हा पार्थपूर (पाथरी) येथे जन्माला आला आहे. तुम्ही आता निघावे व शिष्याला ताब्यात घ्यावे.

सुहागशहांबद्दल सांगताना दासगणू महाराज म्हणतात की महिपती महाराजांनी त्यांच्या भक्तलीलामृत ग्रंथात अध्याय ४३ मध्ये सुहागशहांबद्दल लिहिले आहे. हा भक्तलीलामृत ग्रंथ आज उपलब्ध नाही. दुर्मिळ पुस्तके हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे पुण्यातील नेर्लेकर, त्यांनीही सांगितले की हे पुस्तक मिळत नाही. 

महिपती महाराजांचं स्थान नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे आहे. तेथेही जाऊन ग्रंथ मिळाला नाही. पण गुगल वर तो उपलब्ध झाला आणि सुहागशहांबद्दल थोडक्यात का होईना माहिती मिळाली.
महिपती महाराज मानवाची चार प्रकारात प्रतवारी करताना पुरूष, स्री, नपुंसक व स्रेण असे सांगून सुहागशहा हे स्रेण आहेत व साडी, चोळी, बांगड्या घालून सदैव एकांतात महाविष्णूच्या ध्यानात असत. त्यांचा अजिबात जनसंपर्क नव्हता. त्याकाळी गुजरातेत भीषण दुष्काळ खूप लांबला.
अहमदाबादच्या राजास स्वप्न दृष्टांतात भगवंतांने सांगितले की
माझ्या सुहागशहा भक्तास शरण जा, पर्जन्यवृष्टी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने माणसं पाठवून सुहागशहांचा ठावठिकाणा शोधला व लगेच स्वतः जाऊन सुहागशहांपुढे लोटांगण घालून निवेदन केले की मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया पाऊस होऊ द्या भरपूर. सुहागशहा राजास म्हणाले की मी कोण, मी कुणी नाही, तुम्ही भगवंतास विनंती करावी. मग राजाने सांगितले की भगवंतानेच मला तुमच्या कडे पाठवले आहे. त्याक्षणी सुहागशहा बाहेर येऊन आकाशाकडे पाहत म्हणायला लागले की हे काय माझ्या पाठीमागे लावलंस! तरी आता मानवप्राण्याचे हाल पाहून पाऊस पाड. बराच वेळ प्रार्थना करुन देखील पाऊस पडेना तेव्हा सुहागशहांनी भगवंताला धमकी दिली की थांब, तुझ्या नावाने भरलेल्या या बांगड्या फोडून टाकतो, तुझं कुंकू पुसून टाकतो व तुझ्या नावाने ओढलेली ही ओढणी जाळून टाकतो तेव्हा धुव्वा धार पाऊस सुरू झाला व तो दोन आठवडे चालला. नद्यांना पूर आले. 

राजाने सुहागशहांना विनंती केली की मी तुम्हाला काय देऊ?
सुहागशहांनी मनोमन निर्धार केला होता की ही झंझट नको कारण गर्दी गोळा व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी राजाला सांगितले की माझ्या साठी येथे एक मोठा खड्डा खोदा. व त्या खड्ड्यात सुहागशहांनी लगेच संजिवनी समाधी घेतली.

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज, पिठापूर हे अचानक कधीतरी स्वतःच्या हातात बांगड्या घालून घेत. साडी नुसतीच लपेटून डोक्यावरून घेत. शंकर भट्ट व धर्मगुप्त ज्यावेळी कुरवपूरहून पिठापुरास निघाले तेव्हा रस्त्यात त्रिपुरांतकेश्वर क्षेत्रात बाला त्रिपुर भैरवी येथे दशमहाविद्या क्षेत्रात त्यांना एक संपूर्ण रात्र हा अनुभव म्हणजे योगिक प्रक्रिया श्रीपाद कृपेने अनुभवता आली.
close