shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर मेडीकलअसोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. कडेकर, तर उपाध्यक्षपदी डॉ. काळे यांची निवड

बेलापुर । प्रतिनिधी: - बेलापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर आशुतोष कडेकर (जोशी) तर उपाध्यक्षपदी डॉक्टर संदीप काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.         
                                 डाॅ.आशुतोष कडेकर (जोशी)

डाॅ. संदिप काळे

नुकताच बेलापुर मेडीकल असोसिएशनची बैठक संपन्न झाली.डॉ. संपदा काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील वर्षाकरीता नविन कार्यकारीणी निवडण्यात आली, त्यात अध्यक्षपदी डॉ. कडेकर तर उपाध्यक्षपदी डॉ.काळे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. खजिनदारपदी डॉ. विजय सोमाणी यांची निवड करण्यात आली,यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र निर्मळ म्हणाले की मागील काळ हा अतिशय खडतर होता,रुग्णांची सेवा करताना अनेक डॉक्टरांना देखील कोरोनाची बाधा झाली होती,आपली काळजी घेवुन सर्वांनी कोरोना काळात नागरीकांची चांगली  सेवा केली, येणारा काळ देखील कठीण आहे, आपल्याला नविन आलेल्या ओमायक्राँन सारख्या आजाराचा सामना करावयाचा आहे, सर्व डॉक्टर मंडळींनी आपली स्वतःची काळजी घेवून नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहनही डॉ. निर्मळ यांनी केले. याप्रसंगी डॉ.आशुतोष कडेकर, डॉ. रविंद्र गंगवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ. शशिकांत कडेकर,डॉ.श्रीकृष्ण काळे डॉ.सौ. अर्पणा बडधे,डॉ. सौ. जयश्री राशिनकर, डॉ.सौ. स्मिता कडेकर, डॉ.सौ.आरती गायकवाड, डॉ.सौ.अनिता निर्मळ, डॉ. सौ. भुजबळ,डॉ. सुधीर काळे, प्रकाश जोशी, दिलीप टाकसाळ, संतोष डाकले, ऋषी साळूंके, गंगाराम पवार, अनिल भगत, वैशाली भगत, मच्छिंद्र गवते, शुभम नवले, सौ. सुविद्या सोमाणी, सौ.वनमाला गंगवाल, शितल साळूंके,  उपस्थित होते, शेवटी डॉ.भारत भुजबळ यांनी आभार मानले.
close