shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासनाच्या निर्बंधाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन.

शासनाच्या निर्बंधाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे -   राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेऊन सुरक्षित रहावे. शासनाच्या निर्बंधाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.शनिवारी दि.२२ जानेवारी रोजी इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील,मुख्याधिकारी रामराजे कापरे,नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.जीवन सरतापे, डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाॅ.सुश्रुत शहा,डाॅ.ज्ञानेश्वर भायगांवकर, डाॅ.प्रशांत निंबाळकर,डाॅ.अभिषेक ताटे, डाॅ.ईशा बंगेरा,डाॅ.सुमित्रा कोकाटे,भिगवणचे सहा पो.निरीक्षक दिलीप पवार,वालचंदनगरचे सहा.पो.निरीक्षक बिरप्पा लातुरे,गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,युवकाध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर,बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे,संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे आरोग्य सभापती अनिकेत वाघ,विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांसह आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी, विविध विभगाचे शासकिय कर्मचारी उपस्थित होते.


 
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, शहरात काही मोक्याच्या रहदारीच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. काही नागरिक शासकीय नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलिस विभागा व इंदापूर नगरपरिषदेने याबाबत ठोस भुमिका घेऊन अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचना भरणे यांनी दिल्या. तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे.

तहसिलदार श्रीकांत पाटील म्हणाले की,कोरोना पुन्हा एकदा वाढत आहे.१० जानेवारी पासून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.अशा परिस्थितीत सर्व विभागाने एकजुटीने प्रयत्न केले तर ही संख्या आपण आटोक्यात आनू शकतो. पहिली लाट व दुसरी लाट पाहता तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण जलद गतीने आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर बंद केलेल्या आरोग्याच्या व्यवस्था पुन्हा कार्यान्वित केल्या आहेत.


 
अचानक रुग्ण संख्या वाढली तरी सी.सी.सी.आणि डि.सी.एच. व डि.सी.एच.सी.आदी ठिकाणी १ हजार रुग्णांवर उपचार होतील अशी व्यवस्था सध्या करुन ठेवली आहे.त्यापैकी ५२० बेड हे आँक्सिजन युक्त तयार आहेत.तर ताकुक्यात एकूण शासकीय व खाजगी स्तरावर मिळून ७५ वेंटीलेअर आहेत. डाॅक्टरांची टीम देखील तयार आहे. सध्या इंदापूर तालुक्यात २६३ हे बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी इंदापूर शहरातील रुग्णांची संख्या ९४ असून त्यांवर उपचार सुरु आहेत.मात्र दाहकता कमी असल्याने २६३ पैकी बरेच रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहेत.

विना मास्क संचार करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा – पोलीस विभागास सुचना

पोलीस विभागाने विना मास्क संचार करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी.केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक दिवशी सादर करावा.बावडा,वालचंदनगर, भिगवण,निमगांव केतकी यांसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या व रहदारीच्या ठिकाणी पोलिस पथके नियुक्त करून विना मास्क संचार करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी.अशा सूचना तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी दिल्या.


 
आरोग्य विभागाला कोरोना चाचणी वाढवण्याची सक्त सुचना …

आस्थापनाच्या प्रवेशद्वारावर मास्क बंधनकारक करावे. शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील कोरोना चाचणी करण्यात येईल. आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा. जेणेकरून वेळीच बाधित रुग्णांवर इलाज करुन यावर नियंत्रण मिळवता येईल. प्रत्येक दिवशी किमान १ हजार चाचण्या कशा होतील असे नियोजन करावे.सध्या लसीकरण सुरू आहे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.ते कटाक्षाने कसे होईल याकडे लक्ष द्यावे अशा सक्त सुचना तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी दिल्या.


 
कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून ५० हजार रूपये देण्याची योजना सध्या सुरु आहे.त्यासाठी आँनलाईन नोंदणी करावी लागते.५६५ नागरिकांच्या मृत्यूची आकडेवारी प्रशासनाकडे आहे.यासाठी पोलिस पाटील,सरपंच यांच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना थेट संपर्क करण्यात आला.शासनाच्या योजनेचा लाभ ज्यांना घ्यावयाचा आहे अशा ४०० कुटुंबांची या योजनेकरीता नोंद करण्यात आली असून या बाबत इंदापूर तालुका हा जिल्ह्यात प्रथम स्थानी आहे.
close