shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपचे माजी तालुका सरचिटणीस नितीन नारायण जोशी यांची नगरपंचायत निवडणूकी मध्ये पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी सहा वर्षासाठी हकालपट्टी केली आहे.

अकोले ।  प्रतिनिधी :-
नुकत्याच पार पडलेले  अकोले नगरपंचायत निवडणूकीमध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने पक्षातून ०६ वर्षे निलंबित करण्यात येत आहे.उमेदवार याच्या विरोधात प्रचार आणि प्रसार केला वेळोवेळी समज देऊनही बैठकी घेऊन आपले मनपरीवर्तन करण्याचा प्रयत्न करून आपण ऐकले नाही तसेच तालुक्यातील व वरीष्ठ नेतृत्वाबददल शिव्या लाखोला दिल्या असून तसेच पक्ष कार्यालयात येऊन आम्ही पक्ष लिजवर चालवायला दिला आहे असे संबोधुन पक्ष हिताची बदनामी केली पक्षाच्या ध्येय धोरणाच्या  विरोधात काम करत असून आपणांस 06 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात येत आहे.

 तरी आपण पक्षाच्या बैठका, मेळावे, इतर कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. असे पत्र दिले आहे. या पत्राची प्रत चंद्रकांतदादा पाटील (प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, म. राज्य.)  रविजी अनासपुरे, (संघटन महामंत्री, भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र , किशोरजी काळकर (संघटन महामंत्री अ.जा. भारतीय जनता पार्टी, म. राज्य., राजेंदजी गोंदकर, (जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अ नगर ), आ. वैभवरावजी पिचड (महामंत्री अ.जा. भारतीय जनता पार्टी) यांना देण्यात आली आहे.
close