श्रीरामपूर (शौकतभाई शेख ) :- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार आणि प्रवासी संघटनेचे अजिव सदस्य विजय दत्तात्रय नगरकर यांना इचलकरंजी येथील वसुंधरा सेवाभावी संस्थेच्यावतीने "महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील प्रवासी संघटनेकडून अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्याहस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश चंदन, दत्तात्रय काशिद, विठ्ठलराव कर्डिले, गणेश वाघ, सचिन चंदन, खेमचंद,डॉ. बाराहाते, माणिकराव जाधव,बन्सी फेरवानी,भरत राऊत,किरण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.नगरकर यांचे सामाजिक कार्य केवळ श्रीरामपूर शहर तालुका व अहमदनगर जिल्ह्यापुर्तेच मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर त्यांच्या सुउत्कृष्ठ सामाजिक कार्याची चांगलीच ओळख आहे, नवोदित पत्रकार संपादकांना मार्गदर्शनावितिरिक्त अनेक सामाजाभिमुख उपक्रम त्यांनी राबविले आहे,शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात त्यांची ख्याती तर सर्वांना ठाऊकच आहे, सोबतच त्यांच्या नगरकर सभागृहाच्या माध्यमातून सामाजातील गोर-गरीब उपेक्षितांना आगदी नगण्य शुल्काद्वारे विवाह समारंभ, साखरपुडा, वाढदिवसाचे कार्येक्रम अशा विविध समारंभास ते आपले नगरकर सभागृह अती अल्पदरात उपलब्ध करुन देतात,
तसेच नाट्य कलावंतासाठी रिअसल्स तथा महिला भगीनींसाठी मिटींग आणि इतर समाजोपयोगी कार्यक्रमासाठी नगरकर सभागृह ते निःशुल्क तत्वावर देखील देतात,अशी अनेक प्रकारे त्यांनी आजवर मोठी समाजसेवा केली आहे व करत आहेत,
म्हणूनच त्यांच्या अशा या निर्पेक्ष समाजसेवेची दखल घेऊन इचलकरंजी येथील वसुंधरा सेवाभावी संस्थेच्यावतीने "महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा समाज गौरव पुरस्कार २०२१" हा पुरस्कार देऊन त्यांचा यशोचित सन्मान केला आहे,त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत स्वाभिमानी संपादक सेवा संघ शौकतभाई शेख, समता फाऊंडेशनचे अॅड मोहसिन शेख, दैनिक कॉमन न्यूजचे अल्ताफ शेख, दैनिक जलभूमीचे बाळासाहेब जाधव,साप्ता. शिर्डी एक्सप्रेसचे रमेश जेठे (सर), साप्ता.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शाह मुश्ताकअली, मा.माहिती व अधिकारचे असलमभाई सय्यद,आर.के. न्यूजचे राहुल कोळगे, साप्ता. प्रशासकीय अधिकारीचे अमोल शिरसाठ,आदींनी अभिनंदन केले आहे.

