shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विहिर खोदकाम करणार्या मजूराचा मृत्यूसेलु तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथील घटना ....!


सेलू/प्रतिनिधी
 तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथे सुदाम जोगदंड यांच्या शेतात विहिर खोदकामास आलेल्या राजस्थान येथील किशनलाल रामा भील या मजूराचा उलट्या झाल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार २४ जानेवारीच्या रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ङ्गपोलिस सुत्राकडून दिलेल्या माहितीनुसार तिडीपिंपळगाव येथील सुदाम जोगदंड यांच्या शेतात विहिर खोदकाम करण्यासाठी राजस्थान येथील काही मजूर कामास आले होते. 

सोमवारी रात्री २ वाजेच्यास सुमारास किशनलाल भील यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्याला उलट्याही सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी सुदाम जोगदंड यांनी दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
close