पूर्णा । प्रतिनिधी:- गत काही दिवसापासून हिम (बर्फ) पध्दतीच्या अतिशय थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे लहानासह थोर मंडळी देखील सर्दी, ताप, खोकला, कफ, डोकेदुखी, अशक्तपणा असे आजार वाढत आहेत. या वर्षात दुषीत वातावरण निर्माण होत आहे.
अवकाळी पाऊस, रात्री व दिवसाही रोगट थंडी व गार हवा, यामुळे आजार बळावत असून कोरोना संक्रमणास पोषक वातावरण निर्माण होत आहे. सरकारी व खाजगी रुग्णालयात रुग्ण वाढले आहेत. खाजगी रुग्णालयात कोणी मास्कही लावत नाहीत. खाजगी रुग्णालयात मास्क कमी फीस जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या थंडीच्या दुषीत वातावरणाने नागरिक हैराण झाले आहेत.
पूर्णा तालूक्यात पेटल्या शेकोट्या
थंडीच्या वातावरणाने शेतात, गावात शेकोट्या पेटल्या आहेत. रविवारी रात्री शहर व ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून शेक घेत आहेत. थंडीमुळे अनेक नागरिक, लहान बालके, वयोवृद्ध थंडीच्या वातावरणाने कुडकुडत असल्याचे पहायला मिळते आहे.

