shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेल्वे स्थानकातील वायफाय बंद, केंद्र शासनाचे लाखो रुपये पाण्यात..!


पूर्णा । प्रतिनिधी:-परभणी, पूर्णा, नांदेड येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचारी, अधिकारी व प्रवाशी यांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून वायफाय इंटरनेट सेवा चालू करण्यात आली होती. ती काही दिवस चालली होती. रेल्वेने करोडो रुपयाचे या कामी टेंडर दिले होते. परंतु काही दिवसानंतर ही वायफाय सेवा बंद पडली.

त्यामुळे या सेवेसाठी खर्च केलेले लक्षावधी रुपये पाण्यात जाऊन रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच स्थानकात असलेली सि सि टी व्ही सेवा देखील बंद पडली आहे. यावरही करोडो रुपये खर्च करण्यात आला होता. याकडे रेल्वे प्रशासकीय अधिकारी यांचे दूर्लक्ष होते आहे. रेल्वे अधिका-यांनीच या दोन्ही सेवा चालू करण्यासाठी टेंडर दिले होते. 

हिंगोली, जालना येथे देखील ह्या सेवा बंद आहेत. रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात ह्या दोन्ही सेवा बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेल्वे मंत्री यांच्याच जिल्ह्यात सेवा बंद आहेत तर ईतर ठिकाणी काय चालू होणार?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.
close