कोल्हापूर । प्रतिनिधी :-
पुरोगामी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे,तसेच थोर संतांची भूमी म्हणून अपल्या महाराष्ट्राला ओळखले जाते.
पण याच भूमीत आपल्या वडार समाजाला जातीचा दाखाला देण्यासाठी सन 1961 चा महसुल पुरावा सादर करावा अशी जाचक अट महाराष्ट्र शासन नाहक लादत आहे.या अटीमुळे वडार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक ,यासह विविध शासकीय नोकरी भरती कामी इच्छा-आकांक्षा, गुणवत्ता असुन देखील केवळ जातीच्या दाखला नसल्यामुळे या सर्व घटकां पासून वंचीत राहावे लागत आहे.ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात अशोभनीय आहे.
गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेवर अनेक पक्षांची सत्ता आली.आले किती गेले किती प्रत्येकाने बेचा पाडाच वाचला. वडार समाजाचा प्रगतीचा मार्ग मात्र दिवसेंदिवस खडथरच होत चालला आहे.या सर्व गोष्टींचा सारासार विचार विनीमय करुन सांगली जिल्हा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हा प्रमुख मा.शशिकांत वाटेगावकर बुधवार दि.9/2/2022रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी स्वतःच उपोषणास बसणार आहेत. या त्यांच्या सकारात्मक कार्याला येथील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या वतीने त्यांना जाहिर पाठिंबा व लाख-लाख शुभेच्छा ..! यशवंत हो,किर्तीवंत हो.क्रांतिकारक जिल्हा म्हणून सांगली जिल्हा ओळखला जातोय सर्व महाराष्ट्रभर या सांगलीच्या जय बजंरंग बली वडार बांधवाला या लढ्यात यश प्राप्ती होओ ही सदिच्छा सुरेश वडर यांनी व्यक्त केले आहे.
माहिती संकलन मी वडार महाराष्ट्राचा पन्हाळा तालुका प्रमुख सुरेश वडर

