shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांनी बाभुळगाव येथील कै. सखुबाई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून केले अभिवादन.इंगळे परिवाराच्या सुख - दुःखात नेहमी प्रमाणे दर्शवली उपस्थिती.

राजवर्धन पाटील यांनी बाभुळगाव येथील कै. सखुबाई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून केले अभिवादन.

इंगळे परिवाराच्या सुख -  दुःखात नेहमी प्रमाणे दर्शवली उपस्थिती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे मोहन ज्ञानदेव इंगळे यांच्या आई व युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या चुलती कै. सखुबाई ज्ञानदेव इंगळे यांचा (दि.६ जानेवारी) समस्त इंगळे परिवाराच्या वतीने प्रथम पुण्यस्मरण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळेत विठ्ठल पाटील यांचे हरी किर्तन संपन्न झाले. यानंतर सर्व उपस्थितांनी फुले वाहून कै.सखुबाई ज्ञानदेव इंगळे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

 यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी कै.सखुबाई ज्ञानदेव इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले व नेहमी प्रमाणे पाटील परिवाराच्या वतीने इंगळे परिवाराच्या सुखदुःखात सामील झाले.यावेळी कै. सखुबाई इंगळे यांच्या आठवणींना उजाळा देत इंगळे परिवाराशी संवाद साधला.

खरंच यावरून हर्षवर्धन पाटील जरी होम आयसोलेशन मध्ये असले तरी त्यांच्या कार्याची प्रत्यक्ष धूरा त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातील जनतेच्या सुख - दुःखात सामील होत सांभाळत आहेत असे दिसते.
close