shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव दुय्यम निबंधक कार्यालयात अनाधिकृत व्यक्तीकडुन चुकीचे व गैरकायदेशीर दस्ताची नोंदणी..!!

(सेनगाव वकील संघाचे उप विभागीय अधिकार्‍यांकडे ठरावाव्दारे तक्रार) 

सेनगाव/विश्वनाथ देशमुख: सेनगाव दुय्यम निबंधक कार्यालयात अनाधिकृत व्यक्तीमार्फत चुकीचे व गैरकायदेशीर दस्तांची नोंदणी होत असल्या बाबत दि.४ जानेवारी रोजी सेनगाव वकील संघाच्या वतीने दुय्यम निबंधक कार्यालय यांच्या विरुद्ध ठराव घेऊन मा.उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना निवेदन देण्यात आले आहे.

दुय्यम निबंधक अधिकारी हे वकील मंडळी दस्त नोंदणीची चौकशी करीता आले असता दुय्यम निबंधक अधिकारी सदर दस्त होत नाही असे सांगुण वकील मंडळींना काढुण देतात आणि तोच दस्त बाहेर गैरकायदेशीर पणे काम करणाऱ्या दलाला मार्फेत पैसे घेऊन दस्त करुन देत आहेत.कुळातील जमिनीची विक्री,बँकेंचे बोजा असलेल्या जमिनीची खरेदी-विक्री व वाटणी,आदीवाशी खातेदार त्याच प्रमाणे गुंठेवारी पध्दतीची विक्री अशा प्रकारच्या दस्तामध्ये वकीलांना मा.जिल्हाधिकारी साहेब यांची परवानगी आना म्हणुन सांगण्यात येते.मात्र तोच दस्त विना परवानगी गैरकायदेशीर पणे काम करणाऱ्या दलालाच्या माध्यमातून करुन जास्त पैसे घेऊन केला जातो.यामुळे मोठ्या प्रमाणात कायदीय गुंता-गुंत निर्माण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करुन वकीलांच्या विदवतेवर प्रश्न निर्माण करीत आहेत.

या सर्व प्रकारामुळे सेनगाव वकील संघाचे अध्यक्ष अँड.पि.आर.वानखेडे यांच्या उपस्थितीत वकील संघाचे सदस्य अँड.पि.जी.नायक,अँड.पि.व्ही.नायक,अँड.बि.बि.सावके,अँड.एस.एस.टाले,अँड. आर.डी.कावरखे,अँड.पि.एन.देशमुख,अँड.जी.पी.साखरे,अँड. 

आर.एन.तिडके,अँड.एम.डी.कांबळे,अँड.पि.के.टेवरे,अँड.के.एम.भालेराव आदी वकील मंडळी उपस्थित होती.सदर ठरावा आधारे उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सर्व प्रकार सांगितला आहे.आता उप विभागीय अधिकारी साहेब हे कोणत्या प्रकारची कार्यवाही करतात याकडे सर्व वकील संघ सदस्याचे लक्ष लागले आहे.
close