shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सहारा प्रतिष्ठान केडगाव व एस जी ऑडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार रफीक शेख यांना जाहीर..!!


नगर प्रतिनिधी-(शिवा म्हस्के)

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर येथील सहारा प्रतिष्ठान आणि एस.जी.ऑडिओ यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार या वर्षी नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकारांना देण्यात येणार आहे. सामाजिक कार्यात सहारा प्रतिष्ठान अग्रेसर आहे.


ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काररुपी कौतुकाची थाप देऊन पुढील कामास ऊर्जा यावी या हेतूने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. 
सहारा प्रतिष्ठान सामाजिक क्षेत्रातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असते.आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबरनाथ भालसिंग काम करत असतात.



दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगर तालुक्यातील पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे यामध्ये
    लोकमतचे पत्रकार खासेराव साबळे, नगरी आसूड चॅनलचे संपादक शाम कांबळे, दैनिक सार्वमतचे रियाज पठाण,दैनिक नगर सह्याद्रीचे रफिक शेख ,न्यूज टुडे 24 चॅनलचे संपादक आफताब शेख,आणि दै.जनप्रवासचे जिवाजी लगड यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबरनाथ भालसिंग यांनी दिली.
या पुरस्कारांचे वितरण बुधवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी अहमदनगर येथे होणार आहे.
close