shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओची मात्रा..!

पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमधील झिरो ते पाच वयोगटातील लहान बालकांना रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ ची मात्रा देण्यात येणार असल्याची माहिती पूर्ण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नितीश कुमार बोलो ले व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिनगिनेयांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की झिरो ते पाच वयोगटातील लहान बालकांना आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी पल्स पोलिओ ची मात्रा दिली जाते यावर्षी यासंदर्भात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पूर्णा तहसील कार्यालयात या संदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली या बैठकीला नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीश कुमार तालुका आरोग्य अधिकारी गिनगिने तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीश कुमार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की झिरो ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवारी पल्स पोलिओ देण्यात येणार आहे त्यासाठी पूर्ण येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी यांनी सतर्क राहावे यावेळी पूर्णा शहरांमध्ये एकूण अठरा बूथ तयार करण्यात आली असून यासाठी आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहतील त्यानंतर मंगळवार पासून पूर्णा शहरात घरोघरी पल्स पोलिओची मात्रा दिली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली 
तर त्यानंतर बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिनगिने यांनी सांगितले की पूर्णा तालुक्यामध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रविवारी 11802 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येणार आहे.

 यासाठी एकूण 136 बुथ तयार करण्यात आली असून यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कावलगाव एरंडेश्वर वझुर धानोरा काळे ताडकळस कंठेश्वर येथील सर्व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. त्यानंतर मंगळवार पासून पुढील आठ दिवस ग्रामीण भागामध्ये वंचित राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन पल्स पोलिओची मात्रा दिली जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
close