shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनियर कॉलेज वालचंदनगर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कुमारी प्रतीक्षा पाटील हिचा गौरव.

चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनियर कॉलेज वालचंदनगर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कुमारी प्रतीक्षा पाटील हिचा गौरव.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर भारत चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनियर कॉलेज या शाळेतील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा सुनील पाटील हिने   अधोमुख श्वानासन नामध्ये ७५ मिनिटे व ४ सेकंद अशी विश्वविक्रम वेळ नोंदवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि तिच्या या विक्रमाची पूर्ण देशाने दखल घेतली.
 आज दिनांक २ फेब्रुवारी २०२२तिच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शाळेमध्ये येऊन तिचा सत्कार केला व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळी भारत चिल्ड्रन्स अकॅडमी शाळा समितीचे अध्यक्ष आशिष केसकर, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे,  वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, उपसरपंच सौ. आरती झेंडे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंकुश रणमोडे, प्रतीक्षा हिचे वडील सुनील पाटील. शाळेचे प्राचार्य शिरसागर सर, शाळेचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य कृष्णदेव शिरसागर सर यांनी केले.

 यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शाळेच्या व्यवस्थापन समिती व प्राचार्य यांच्या  कामगिरीचे कौतुक करीत शाळेतील शिक्षकांचातील महिला शिक्षकांच्या लाक्षणिक संख्येबद्दल आदर व समाधान व्यक्त केला. कु. प्रतीक्षा व तिच्या पालकांचा सन्मान कौतुक शालेय विद्यार्थ्यांना शिस्त जिद्द व चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना शाळेच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा. िद्यार्थ्यांनी प्रतीक्षा चा आदर्श घ्यावा आयुष्यातील शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्‍वास, अथक परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास, करून जीवनात यशस्वी होण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ, स्वाती रणमोडे, सौ. अमृता कोळेकर मॅडम यांनी केले.

 या कार्यक्रमास अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, अतुल तेरखेडकर,वसंत मोहोळकर,नंदकुमार सोनवणे,काका पाटील,राजू हागवणे, सुभाष भरते,सचिन अचालारे ,राजेंद्र गायकवाड, विलास माने, भाजपा इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे, संतोष कदम, डॉक्टर विकास शहा आदी मान्यवर उपस्थित होते.


close