वालचंदनगर मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली चाय पे चर्चा.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर येथे भारत चिल्ड्रन ॲकॅडमी मध्ये विद्यार्थिनी प्रतिक्षा पाटील यांच्या सत्कार समारंभासाठी व विविध ठिकाणी सांत्वन भेटी साठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आले असता त्यांनी
वालचंदनगर मधील सुप्रसिद्ध हॉटेल रुचिरा येथे चहाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून थांबले होते.
हॉटेल रुचिरा चे मालक शिरीष कस्तुरे, इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, वालचंदनगर सरपंच कुमार गायकवाड, इंदापूर तालुका
भाजपा सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे, युवा नेते दयानंद झेंडे, संतोष कदम सर, पांडुरंग गायकवाड, सचिन शेठ अचालारे , अमोल बोंद्रे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी श्री शिरीष कस्तुरे यांना चहा हा त्यांचा आवडता पदार्थ आहे व बरेच ठिकाणी ते चहा घेत असतात पण वालचंदनगर मधील त्यांचा हॉटेलमध्ये चहाचे चवच वेगळी आहे असे नमूद करून कौतुक केले. सदरची चर्चा करत असताना महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू पवार व अनिकेत रणमोडे हे देखील सामील झाले. सरपंच कुमार गायकवाड यांनी हर्षवर्धन पाटील यांना वालचंदनगर ग्रामपंचायत मधील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी वेळ मागितला हर्षवर्धन पाटील यांनी लवकरच वालचंदनगर मध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ व जाहीर सभा देखील घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांनी शेवटी सदरचा चहा हा सरपंच कुमार गायकवाड यांचा मार्फत आहे व त्यांनी त्याचे बिल भरावे असे बोलल्यानंतर एकच हशा पडला.
ह्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे बरेचस कार्यकर्त्यांनी भेट घेतली.वालचंदनगर,कळंब व रणगाव मधील बरेच कार्यकर्त्यांनी सदरच्या ठिकाणी भेट घेतली.

