shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनियमित कामगारांचे प्रश्न असणारे राज्यात असे किती कर्मचारी असून त्याचा सरकारवर किती बोजा पडेल यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांनी मागवला अहवाल..

अनियमित कामगारांचे प्रश्न असणारे राज्यात असे किती कर्मचारी असून त्याचा सरकारवर किती बोजा पडेल यासंदर्भात  नगरविकास मंत्र्यांनी मागवला अहवाल..

 
इंदापूर नगरपालिकेच्या अनियमित कामगारांचे प्रश्नसंदर्भात ना. अजित पवार  यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.

नगरविकास मंत्री ना.एकनाथराव शिंदे, राज्यमंत्री ना.  दत्तात्रय  भरणे, प्रदीप गारटकर, नगरविकास खात्याचे सर्व मुख्य व प्रधान सचिव यांची बैठकीस उपास्थिती.

इंदापूर प्रतिनिधी:मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दु.१२:३० वा. उपमुख्यमंत्री ना . अजित पवार  यांचे दालनामध्ये इंदापूर नगरपालिकेच्या अनियमित कामगारांचे प्रश्नसंदर्भात ना. अजित पवार  यांचे अध्यक्षतेखाली व नगरविकास मंत्री ना.एकनाथराव शिंदे, राज्यमंत्री ना.  दत्तात्रय  भरणे, प्रदीप गारटकर, नगरविकास खात्याचे सर्व मुख्य व प्रधान सचिव यांचे उपास्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये  नगरविकास मंत्री यांनी सदर कर्मचारी हे वर्षानुवर्षे त्या ठिकाणी नगरपालिकेचे काम करत आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही आणि सकारात्मक घेण्याचे सांगितले व सचिवांना अशा सूचना देण्यात आल्या की, लवकरात लवकर राज्यामध्ये असे किती कर्मचारी आहेत व त्यांचा बोजा सरकारवर किती पडेल असा अहवाल देण्याच्या सूचना केल्या व त्यानंतर सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले. त्यास ना. अजित पवार ,ना . दत्तात्रय  भरणे व प्रदीप गारटकर यांनी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आवाहन केले. 
यावेळी धनंजय बाब्रस, राजेंद्र चौगुले, श्रीधर बाब्रस, बाळासाहेब व्यवहारे, मोहन शिंदे, मनोज भापकर, सुरेश सोनवणे, दिपक कवितके इ. उपस्थित होते.
अशी माहिती माजी नगरसेवक  श्रीधर बाब्रस यांनी दिली.
close