नगर । प्रतिनिधी :-
दिनांक 01 फेब्रुवारी 2022 रोजी शिंगवे नाईक तालुका नगर येथील राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांना श्रीफळ अर्पण करून शिवगर्जना न्यूजचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
लोकार्पण सोहळ्याला अहमदनगर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेशजी कारले, देहरे गणाचे पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, मांजरसुंबा आदर्श गावचे सरपंच जालिंदर कदम, तसेच खोसपुरी येथून माजी सरपंच बाबाभाई शेख,व विद्यमान सरपंच मुबारकभाई पठाण,वीरभद्र विद्यालयाचे शिक्षक देवकर सरजी,माजी संरपंच अर्जुन आव्हाड काका, शिवाजीराव दानवे, शिंगवे येथील माजी सरपंच विश्वासराव जाधव, तसेच विद्यमान उपसरपंच सुनीलजी जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते हरीशजी शेळके, ज्येष्ठ पत्रकार उदय धामणे, आधार न्यूजचे ब्युरो चीफ रावसाहेब वर्पे,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कोळपकर, ट्रस्टचे अध्यक्ष विकास काळे,आयाज सय्यद, अनिकेत डोळस,चर्मकार विकास संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी डोळस, निलेश लंके प्रतिष्ठानचे शाखा अध्यक्ष जावेद सय्यद, युवा सेना अध्यक्ष प्रवीण जाधव, आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शिवगर्जना न्यूजला व संपादक अमोलजी डोळस व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या,तसेच यापुढील काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देण्याचे काम शिवगर्जना भविष्यकाळात करतील अशी अपेक्षा व्यक्त केली..!

