इंदापूर (प्रतिनिधी) - येथील शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम कसबा पेठ याठिकाणी आज रोजी संपन्न झाला,या कार्यक्रमात इंदापूर शहरातील अनेक नागरिकांनी उत्सुकता दाखवली, संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच देशात ७० टक्के नागरिकांनी लसीकरण केले असल्याचे बोलले जात आहे.हा इतर देशांपेक्षा आपल्या देशात मोठा विक्रमच आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य शेतकरी विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार जावेदभाई शेख, प्रदेश उपाध्यक्ष वैभव सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे,अली अकबर मणेरी, अफजल कुरेशी, युनुस मणेरी, सोहेल तांबोळी, सईद मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले, यावेळी विचारमंथनचे प्रकाश पवार,वसीम बागवान तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी भेटी देऊन लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांना प्रोत्साहीत केले.

