shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराचे आयोजन...!


धुळे । प्रतिनिधी ( दिलीप घरटे ) :-
पिंपळनेर येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार साक्री विधानसभा सौ. मंजुळाताई गावित व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य धुळे डॉ. तुळशिराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. शुक्रवार दि. १८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन राजे छत्रपती इंग्लिश मेडीयम स्कुल, सामोडा चौफुली, पिंपळनेर येथे केले आहे. 

या शिबीरामध्ये मोफत नेत्र तपासणी करुन डोळ्यांच्या समस्यावर योग्य मार्गदर्शन व औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच चष्म्याचा अचुक नंबर काढून दिला जाईल व रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी करुन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली जाणार आहे. तरी परिसरातील गरजू नागरिकांनी व नेत्र रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९०११३०२९७७ / ९७५८६०७०९० यावर संपर्क साधावा. नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजक राजे संभाजी ग्रुप, पिंपळनेर सरकार ग्रुप, पिंपळनेर, B.T.K. ग्रुप, पिंपळनेर, भद्रा ग्रुप, पिंपळनेर, समर्पण सेवाभावी संस्था, पिंपळनेर गोपाल नगर नवयुवक मित्रमंडळ, पिंपळनेर यांनी केले आहे.
close