shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अविनाश आदिक यांच्या हस्ते रफिकभाई शेख यांचा सत्कार..!!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख):  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे मार्गदर्शक रफिकभाई (उर्फ भय्याभाई) शेख यांची श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या हस्ते शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,




श्री.आदिक यांच्या प्रयत्नातूनच रफिकभाई शेख यांची श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, या सत्काराप्रसंगी वडाळा महादेव येथील ज्येष्ठ नेते उत्तमकाका पा. पवार,वडाळा महादेव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दादासाहेब पा झिंज,विनोद पा. मलिक, इंजि.भाऊसाहेब पा. वाघ,रमेश रावसाहेब पा.पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पा.पवार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास पा पवार,वडाळा महादेव ग्रामपंचायतीचे सदस्य विजय पा.उघडे आणि राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे प्रदेशाध्यक्ष मुजीबभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

close