इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ८ कोटी ५ लाख मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी:शासकीय आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशियाई विकास बँक यांच्या निधी उपलब्ध करून दिला जाईल यामध्ये इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ८ कोटी ५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वेळोवेळी नविन आरोग्य संस्था स्थापनेस श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात आली आहे. प्रामुख्याने बांधकाम यंत्रसामग्री उपकरणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करणेकरीता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. सध्याच्या सुरु असलेल्या कोविड – १९ च्या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने उपचारात आवश्यक बदल व अत्याधुनिक सुविधांवर भर दिला जातो. सदर कामे मंजूर झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने काम करू शकेल अशी प्रयिक्रिया राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोटी १५ लक्ष,पोंदकुलवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लक्ष,बोरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र २ कोटी ३० लक्ष, अगोती नं.१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लक्ष,अंथुर्णे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लक्ष, डाळज नं.१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १ कोटी १५ लक्ष असे एकूण ६ ठिकाणी ८ कोटी ५० लक्ष मंजूरी देण्यात आली आहे.

