shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर नगरपरिषदेकडून मल: निस्सारण वाहनाचे लोकार्पण स्वच्छतेच्या कामांना मिळणार गती : शहरातील १८६ सार्वजनिक शौचालये होणार चकाचक

इंदापूर नगरपरिषदेकडून मल: निस्सारण वाहनाचे लोकार्पण 

स्वच्छतेच्या कामांना मिळणार गती : शहरातील १८६ सार्वजनिक शौचालये होणार चकाचक 

इंदापूर  प्रतिनिधी :इंदापूर शहरातील नागरिकांना सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेला गती मिळावी. शहरातील स्वच्छतेचे विविध कामे जलद गतीने व्हावेत. यासाठी आपल्या नगरपरिषदेला स्वच्छता अभियानात मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतुन विविध अद्यावत वाहने खरेदी केली असल्याने, इंदापूर नगरपरिषदेची हायटेक कामाकडे वाटचाल करीत आहे. असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले. 
इंदापूर नगरपरीषदेच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या, ३२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे, साडे तीन टन क्षमता असलेल्या हायटेक मल: निस्सारण वाहनाचे ( सक्शन मशीन ) चे लोकार्पण, सहायक आरोग्य निरीक्षक व शहरातील सार्वजनिक शौचालय स्वच्छतेची जबाबदारी असणारे कर्मचारी सुनिल लोहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरसेवक भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, कर्मचारी अशोक अडसूळ, भागवत मखरे,  मोहन शिंदे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. 


इंदापूर शहराच्या हद्दीत एकूण १८६ सार्वजनिक शौचालयांची संख्या आहे. त्याच बरोबर २० सार्वजनिक मुताऱ्या आहेत. पूर्वी या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी एकच ट्रॅक्टर होता तोही अनेक वेळा वाहतुकीस अडथळा करीत होता. तसेच ते वाहन मागील अनेक वर्षापासून जुने झाले होते. त्यामुळे नवीन वाहनाची आवश्यता होती. हे नवीन वाहन नगर पालिकेच्या ताफ्यात आल्याने आता कामाला गती मिळणार आहे.







close