shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री तनपुरेंच्या हस्ते डिग्रस येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   


 राज्यमंत्री तनपुरेंच्या हस्ते डिग्रस येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन..!!


राहुरी : तालुक्यातील डिग्रस येथे दि २९ जानेवारी २०२२ रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते गावातंर्गत रस्ते आणि इतर विविध विकास कामांचे भूमीपुजन करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाने संपादीत केलेल्या जमीनीवर अतिक्रमण करुन राहाणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे असे मत मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केले. परंतु ज्या मागासवर्गीय लोकांनी आपल्या जमीनी विद्यापीठाला शिक्षण व संशोधनाला दिल्या, त्या जमीनीचा वापर विद्यापीठाने केला नाही. आज सहा गावचे प्रकल्प ग्रस्त शेतकरी आज भुमीहिन झाले आहेत. विद्यापीठाच्या अतीरीक्त जमीनी वर दुसरेच अतिक्रमण करून राहत आहेत. ' मंत्री महोदयांनी या प्रकल्पग्रस्तांचा ही विचार करावा अशी जमलेल्या ग्रामस्तांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत होती.

 
यावेळी जि.प. सदस्य धनराज गाडे, पं सं उपसभापती प्रदिप पवार, डिग्रस गावचे सरपंच पोपटराव बर्डे, माजी पं सं सभापती रावसाहेब भिंगारदे, माजी सरपंच रावसाहेब पवार, मा पं स सदस्य सचिन भिंगारदे, केशव बेल्हेकर, शामानंदगिरी महाराज, मा. उपसरपंच मधुकर पवार, संदिप कोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थीत होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close