२०२० मध्ये भारतात कोरोनाने थैमान घातले.. अंगात बारा हात्तीचे बळ संचारले.. चोरून लपून जनसेवा चालूच ठेवली.. मित्रांचा व घच्यांचा विरोध सोबत मधुमेह, बी पी असे लाडके साथीदार..
*पण मी स्वत:ला बजावायचो भास्करराव वडील व बबूताई आई यांनी मजबूत देह यष्टी मला समाज सेवे साठीच दिलेली आहे.. ७२ चा दुष्काळ व त्यानंतरचा खडतर प्रवास पण माझा सांभाळ त्यांनी युध्दातील सिंहा सारखाच केला.. उच्च मुल्य उच्च शिक्षण व इमानदारीने कष्ट करण्याचे शक्ती आणि सामर्थ्य दिले.
कॉलेजला मड गार्ड, चैन कव्हर , पायडलला लाकडी ठोकळे ,ज्याला काळ्या तेलाचे वंगण, पायजमा शर्ट टोपी असा पेहराव घेऊन पुणे विद्यापीठात एमएस्सी झोलो.. नोकरीला लागलो स्व हिमतीवर आयुष्यभर बूलेट वापरली, स्वत:ची अँबेसेडर वापरली.. सगळ्या मज्जा केल्या .. पण हे सगळं कौतूक पहायला आई आणि वडील नाही राहीले.
दोन वर्षाच्या सेवेनंतर एका कुठल्यातरी गहाळ खिंडीत मला कोरोनाने गाठले.. हा आठवडा आंदोलने व भरगच्च कार्यक्रमांचा होता.. प्रथम कणकण सुरू झाली.. गोळ्या घेतल्या.. कार्यक्रम चालूच होते.. आमच्या लाडक्या मोन्याच्या बहीणीचा साखरपुडा...! कार्यालयाची पायरी चढत होतो.. मास्कला कडवट आमृत रस लावण्यात मी मग्न होतो.. उग्रतेने डोळ्यातून पाणी येऊ लागले पण आमृतरस लागल्याचा वास मला येईना.. सोबतच्या वीजूला विचारलं आमृतरस चा प्रभाव संपला काय? त्याने सांगितले तुमचाच आमृतरसाचा उग्र वास येऊ राहीला.. पाल चुकचुकली कोरोनाने गाठले.. कार्यालयाच्या पायरीवरून पाय उतार झालो आणि घरात विलग झालो
डॉ विलास आचारी व डॉ फुलसुंदर, डॉ संतोष आव्हाड, डॉ श्रीमाळी यांना कल्पना दिली.. त्यांनी औषधोपचार सांगितला व आठ दिवस घरात थांबण्याचा सल्ला दिला.. काही वाटले तर ताबडतोब कळवण्याचे बजावले..!
माझी विलगिकरणाची झुंज सुरू झाली.. कुणाशी बोलायचे नाही.. एकटे रहायचे.. माझी पथारी बेडरूम मध्ये.. माझ्या वाघीणीची पथारी हॉल मध्ये.. पण गूरगूरणारी नजर माझ्यावर .. गोळ्या घ्या वाफ घ्या.. औषधे घ्या.. मोबाईल ठेवा.. मुलांना सांगायचं नाही ठरलं.. ते कटाक्षाने टाळलं..
जेव्हा माझी वाघीण बाबांची उदी व तीची करडी नजर घेऊन उभी आहे व जनतेची सेवा अजून बाकी आहे तर कोरोनाला परत जावेच लागेल.. लढाई मी जवळ जवळ जिंकलीच आहे.. लक्षणे जाऊ लागले आहेत..!
कोरोनाने शिकवलं घाबरायचं नाही.. जो घाबरला तो संपला.. माझी धाकली मंगल घाबरली नसती तर दर राखी पौर्णिमा व भाऊबीज तीने टाळली नसती.. कोरोनाला घाबरू नका, फक्त धैर्य ठेवा , पथ्य पाळा, डॉक्टरांचा योग्य व वेळेत सल्ला घ्या, कुठलाही आजार अंगावर काढू नका,आहार सात्विक ठेवा.. ज्या डॉक्टरचे उपचार घेत आहात त्यांचेवर विश्वास ठेवा.. साईबाबा देव त्यांच्यातच आहेत. मला सूखरूप त्यांनी व माझ्या वाघीणीनेच ठेवले.
संजय भास्करराव काळे
कोपरगाव, जि.अहमदनगर.

