shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घाटात लुटायचे अहमदनगरमधील सहा दरोडेखोर, भुदरगड पोलिसांचा अन दरोडेखोरांचा सिनेस्टाइल थरार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२   

घाटात लुटायचे अहमदनगरमधील सहा दरोडेखोर, भुदरगड पोलिसांचा अन दरोडेखोरांचा सिनेस्टाइल थरार..!!
राहुरी तालुक्यातील सहा जणांचा समावेश..!!


अहमदनगर : नवले घाटात गाडी अडवून प्रवाशांना बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोराच्या टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलिसांनी सिनेस्टाईलने जेरबंद केले आहे. सदर प्रकरणात भुदरगड पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सहा जणांवर (बुधवार) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान चौकशीअंती या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात असा पोलिसांचा कयास आहे. समीर सुरेश पारखे (वय-23 रा, धामोरे खुर्द), मिलींद दत्तात्रय हरिश्चंद्रे (वय-23 खंडबे बुद्रुक), प्रतीक अर्जुन लटके (वय-23), सोमेश्वर प्रकाश हरिश्चंद्रे (वय-25) 
अभिमन्यू भागवत पवार (वय-23 रा. खंडबे खुर्द), महेश परसराम कल्हापुरे (वय-23, रा. वांबोरी ) सर्व अहमदनगर जिल्हातील राहुरी तालक्यातील आहेत. या सहा जणांवर पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की बाळकृष्ण शामराव पाटील (मुरूडे, ता. आजरा) व त्यांचा मित्र आपल्या गाडीने सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान जात होते. या दरम्यान गोवा येथून राहुरी तालुक्यातील युवक आपल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने गारगोटीच्या दिशेने येत होते.

यावेळी नवले येथे राहुरीच्या या टोळीने इरटीगा गाडीतील प्रवाशांची लूट करण्याच्या इराद्याने इरटीगा गाडी अडवून बाळकृष्ण पाटील व त्यांच्या मित्रास जोरदार मारहाण केली. यावेळी बाळकृष्ण यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन मिलिंद दत्तात्रय हरिश्चंद्रे (वय 23, रा. खडांबे बुद्रुक, ता. राहुरी) याने मारून लांबवली यानंतर स्कार्पीओ गाडीतील सर्व युवकांनी पलायन केले.
दरम्यान त्यांनी लगेच भुदरगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी तातडीने पोलीस यंत्रणा सतर्क करून सर्वत्र नाकाबंदी केली. स्कार्पीओ गाडी गारगोटीच्या दिशेने येत असल्याचे समजताच पोलिसांनी स्कार्पीओ अडविण्याचा प्रयत्न करून
सदर आरोपींना जेरबंद केले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close