shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिजाबच्या धार्मिक हक्कासाठी व अल्पसंख्याक समुदायावर होणारे सांप्रदायिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने देण्यात आले निवेदन..!


संगमनेर:-हिजाबच्या धार्मिक हक्कासाठी व अल्पसंख्याक समुदायावर होणारे सांप्रदायिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोग, मा. मुख्यमंत्री, कर्नाटक राज्य यांना मा. तहसिलदार, संगमनेर यांचे मार्फत निवेदन देऊन संविधानिक मार्गाने सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले.

कायदा व संविधानाला न मागणा-या कर्नाटक मध्ये कार्यरत अशासकीय संघटनेच्या हिजाब विरुद्ध वेकायदेशीर मागणी करून समाजामध्ये विष कालवणा-या समाजकंटकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मुस्लिम स्वयंमसेवक संघाची पंतप्रधान मुख्यमंत्री अल्पसंख्याक आयोगाकडे मागणी संगमनेर प्रतिनिधी तीन दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये कोणतेही अधिकार नसताना एका महाविदयालयात मोठा जमाव गोळा करून अशासकीय संघटनेच्या नावावर घुडगुस घालून एका अल्पसंख्याक शालेय विदयार्थीनीच्या हिजाब विरुध्द विरोध करून मोठया जमावाने घोषणाबाजी करत अत्यंत घाणरडे व समाज विघातक कृत्य करून एक प्रमाणे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून सदरील त्या समाजकंटाकवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता सर्व राज्यात विविध अल्पसंख्यांक संघटनेच्या माध्यमाने जोर धरु लागली असून अतिशय चीड आणणारी ही घटना असून कोणत्याही समाजाच्या प्रत्येक युवतीने कोणता पोशाख धारन करावा हा तिचा अधिकार असून केवळ राजकीय संघटनेच्या नावावर कोणीही कोणत्या समाजाच्या रुढी विरुद्ध आंदोलन करण्याचा कोणालाही अधिकार नसुन कायदा व संविधानाला न मानणा-या या अशासकीय संघटनेला बेकायदेशीर कृत्य करण्यात राजकीय प्रोत्साहन व संरक्षण असल्याशिवाय हे होणे शक्य नसून कोणत्याही महाविदयालयाच्या आवारात प्रवेश करून एखादया विशिष्ट समाजाच्या युवतीला तिला हिजाब विरुद्ध विरोध करून तिला एकटी पाहून मोठ्या जमावाने घेरने या घाणेरड्या कृत्याला कायदेशीर कोणी अधिकार दिले. याची देखील विचार करण्याची गरज असून सदरील या समाज विघातक कृत्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत संगमनेर शहरातील कार्यरत मुस्लिम स्वयंसेवक संघामार्फत या संघाचे प्रमुख मोहसिन मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील तहसिलदार अमोलजी निकम यांना असंख्य पदाधिकारी महिला व कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यात आले असून सदरील निवेदनाच्या प्रती देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, मुख्यमंत्री कर्नाटक अल्पसंख्यांक विभाग कर्नाटक यांना देखील पाठविण्यात आले असून यावेळी संत ईग्नाथी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फा. सतीशजी कदम, मुस्लिम धर्माचे संगमनेर शहर काझी रकीबजी सैय्यद, दार-ऊल-उलूम बरकात-ए- शेर-ए-नेपालचे मौलाना हाफिज रेहान रजा बरकाती, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अनिलजी भोसले, वरिष्ठ आर. टी. आय. कार्यकर्ते मुझफ्फरजी शेख, न्यूज एन. एस. पी. चे मुख्य कार्यकारी संपादक शौकतजी पठाण, पत्रकार इमान शेख, न्यूज एन. एम. पी. चे सह संपादक जमीर शेख, मुनीर शेख, इमान पटेल, शहेबाज शेख, मोहसिन मनियार आणि बुरखा हिजाब परिधान केलेल्या शबनमजी जावेद शेख, निलोफरजी सैय्यद, तैबाजी जावेद शेख, सादियाजी पठाण, सकिनाजी पठाण या महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
close