shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरच्या व्यापाऱ्यावर बाजारपेठेत भरदिवसा गुंडांचा हल्ला


"त्यांच्या" दहशतीमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य उरलेले नाही - काँग्रेसचा आरोप 

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १२ / नगरमधील मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत भरदिवसा सीए असणाऱ्या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्यावर २५ ते ३० गुंडांच्या जमावाने शुक्रवार दि .११ रोजी सायंकाळी ५ वाजता हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत. यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बंदूक, धारदार शस्त्राचा धाक दाखवून हत्या करण्याची देखील धमकी देण्यात आल्याचे बोरा यांनी सांगितले. 

 बोरांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लिखित अर्ज करून संरक्षण मागून देखिल दिले गेले नाही. वेळीच संरक्षण दिले असते तर बाजारपेठेत गुंडांची धुडगूस घालण्याची हिंमत झाली नसती.  काँग्रेसचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, अनंतराव गारदे, खलील सय्यद आदींसह कार्यकर्ते गुन्हा दाखल होईपर्यंत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. दरम्यान काल रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी बोरा यांच्या फिर्यादीवरून भादवी १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४,५०६, शशस्त्र अधिनियम ३, २५ अन्वये अजित औसारकर, अनील औसारकर, सुजित औसरकर, अगर यांच्यासह अन्य वीस ते पंचवीस अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

काँग्रेस कार्यालयामध्ये किरण काळे यांच्या उपस्थितीमध्ये खते, बी-बियाणे याचे व्यापारी अजय बोरा यांनी पत्रकारांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.
औसरकरांनी जागा खाली करून घेण्यासाठी तृतीयपंथीयांना मुखत्यारपत्र करुन दिले आहे. ताबा मारण्यासाठी दहशत करून षडयंत्र रचले जात आहे. 

बोरा यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, शहारातील बड्या राजकीय प्रस्थाशी नातेसंबंध असणाऱ्या शशिकांत घिगे यांनी ही जागा खाली करून घेण्यासाठी आमच्यावर अनेकदा दबाव आणला. या व्यवहारातील घिगे हाच मूळ मध्यस्थ आहे. तेवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून त्यांनी तृतीयपंथी, महिला भगिनी, गुंड यांना आमच्यावर सोडलं. विनयभंग, ॲट्रॉसिटीची धमकी दिली. औसरकर यांना केवळ चेहरा म्हणून पुढे करण्यात आले आहे. धमक्या, दरोडा, मारहाण, छळवणूक, शोषण यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. ४-५ महिन्यांच्या अल्प कालावधीत १२ फिर्यादी दाखल झाल्या आहेत. फिर्यादी दाखल होऊन देखील पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा दहशतीत या शहरात व्यापाऱ्यांनी जगायचे तरी कसं ? असा उद्विग्न सवाल यावेळी बोरा यांनी उपस्थित केला.
close