shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक.

जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  इंदापूर
  तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची   बैठक. 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २५ फेब्रुवारी रोजी इंदापूर दौऱ्यावर येणार असून 
या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी,दुपारी १ वाजता राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे प्रमुख उपस्थितीत इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,प्रशासकीय इमारतीत तात्काळ आढावा बैठक आयोजित करण्यात आलीआहे. जयंत पाटील  यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यास या आढावा बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत.

इंदापूर तालुक्यात   इंदापूर नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा इंदापुर दौरा लक्षवेधी करणार आहे.
close