shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनुजा निचत ह्यांना २०२२ चा नॅशनल वूमेन्स एक्ससिलेन्स अवॉर्ड जाहीर ...९ मार्चला दिल्लीत होणार सत्कार..


प्रतिनिधी : संजय वायकर

 मुंबई : २६ /  कोरोनाच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीबांना आर्थिक मदत तसेच मोफत अन्न धान्य   अनुजा निचत यांनी वितरीत केले . निचत एक समाजसेविका असून त्यांच्या पतीसोबत  खांद्याला खांदा लावून अहोरात्र मदद करत असतात .  होप फाऊंडेशन मार्फत  सामाजिक कार्य करत आहेत.

त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महिला दिनानिमित्त २०२२ चा  नॅशनल वूमेन्स एक्ससिल्लेन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे. हा सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्या हेतू घेण्यात येणार आहे.

 डॉक्टर विशाखा सोसिअल वेल्फेर फौंडेशन, आदिलेला फौंडेशन, दीप वेलफेरे सोसायटी, भगवान वाल्मिकी फौंडेशन, MSY मेमोरियल फौंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार  सोहळा ९ मार्च २०२२ रोजी  कॉन्फरेन्स हॉल जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून मा. श्री अमोलक्रतन कोहली, माजी राज्यपाल (मिझोराम) प्रमुख पाहुणे म्हणून मा. रामदास आठवले जी लाभलेले आहेत .    

 विशेष अतिथी म्हणून सन्मानीय श्री . प्रियांक कानुंगो (चेअरमन एन सी सी आर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया), डॉ. ज्ञानेश्वर मुले (मेंबर हुमान राईट्स कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) श्री झाकीर खान (चेअरमन डी एम सी गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . डॉ मनीष गवई, डॉ. आदिनारायण, श्री अजय प्रकाश, इत्यादी आयोजकांनी हि माहिती निमंत्रणाद्वारे दिली. 

अनुजा निचत यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
close