shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने "आई " या विषयावर काव्यलेखन स्पर्धा...!


श्रीरामपूर :- वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन, अर्थात जागतिक संविधान व संसद संघ ( डब्ल्यूसीपीए ) यांच्या वतीने " आई " या हृदयस्पर्शी विषयावर काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी मराठी भाषेतील कवी व कवयत्रींनी स्वरचित एक कविता स्वतःच्या अल्पपरिचय व पासपोर्ट फोटोसह wcpashrirampur@gmail.com
 या इमेल आयडीवर पाठवावी अशी माहिती डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे.

             सदर कविता पाठविण्याची अंतिम दिनांक ५ मार्च २०२२ हि असून सदर स्पर्धेसाठी कुठलीही प्रवेश फी आकारली जाणार नसून स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना सन्मानपत्र, मानचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे आजीव सदस्यत्व दिले जाणार तरी आईवर खऱ्या मनाने प्रेम करणाऱ्या कवी / कवयत्रींनी आपली स्वरचित काव्यरचना त्वरीत पाठवावी. या संदर्भात अधिक चौकशीसाठी डॉ. दत्ता विघावे यांच्याशी ९०९६३७२०८२ या दूरध्वनीवर संपर्क करावा.

              सदर काव्य स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा वर्ल्ड पार्लमेंटच्या एक रंगारंग कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहीतीही डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे.
                 
close