राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न कामगार संघटना /फेडरेशन स्थापन ची महत्त्वाची घोषणा.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष कार्यालय मुंबई येथे कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव शिवाजीराव गर्जे , प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल शिवाजीराव खटकाळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल चे प्रदेश प्रतिनिधी व जिल्हा अध्यक्ष यांची बैठक (दि.२४ फेब्रुवारी) झाली.
या बैठकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सलंग्न कामगार संघटना /फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे सेक्रेटरी सोमनाथ शिंदे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल निवृत्ती देसाई, विलास हुले पाटील, विजय काळोखे, योगेश जाधव, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड रा. का. सेल किरण देशमुख, नानासाहेब थोरात तसेच रत्नागिरी, धुळे, औरंगाबाद, अकोला, नाशिक, पुणे, लातूर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, नगर, नवी मुंबई, पनवेल येथील कामगार सेल चे शहर, जिल्हा - तालुक्यातील अध्यक्ष व कार्यकारिणी उपस्थित होती.
यावेळी कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले .तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल शिवाजीराव खटकाळे यांनी फेडरेशन /संघटना स्थापन करण्याबाबची भुमिका स्पष्ट केले बाबतची माहिती दिली.

