पूर्णा । प्रतिनिधी :
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज रविवारी (दि.२७) दुपारी दीड वाजता परभणी जिल्ह्यात दाखल होणार असून ते या दौर्यात परभणी महानगरपालिकेंतर्गत विविध भूमीपूजन समारंभास उपस्थित राहणार असल्याची अशी यांनी दिली.
दुपारी ३ वाजता नांदेड येथून ते जांब (ता.परभणी) याठिकाणी दाखल होणार असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन, जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा तसेच नाबार्ड अंतर्गत बाभूळगाव ते मांडाखळी ग्रामीण रस्त्याचा भूमीपूजन समारंभ होणार आहे. ४.३० वाजता ते परभणीत दाखल होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणार्या रस्त्याच्या भूमीपूजन समारंभांना ते उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालय ते दर्गा या रस्ते कामाचा शुभारंभ झेंडा चौकात होणार असून उड्डानपूल ते कौंडगाव रेल्वे गेट या कामाचा शुभारंभ बियाणे महामंडळ परिसरात, लोहगाव रेल्वे गेट ते गंगाखेड नाका या रस्ते कामाचा शुभारंभ गंगाखेड नाका परिसरात, जिल्हा रुग्णालय ते जाम नाका या रस्ते कामाचा शुभारंभ जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर, महाराणा प्रताप चौक ते जूना पेडगाव रस्ता उर्वरीत रस्ते कामाचा शुभारंभ अन्नपूर्णा मंगल कार्यालय, महाराणा प्रताप चौक ते नानलपेठ ते धार रस्ता या रस्ते कामाचा शुभारंभ आंध्रा बँक कॉर्नर, जायकवाडी कॅनॉल ते खंडोबा बाजार या रस्ते कामाचा शुभारंभ झाकीर हुसैन विद्यालय परिसर तसेच गुलशन फंक्शन हॉल ते वांगी रस्ता यास राज्यमार्ग म्हणून दर्जा बहाल केल्याबद्दल हारी कॉर्नरवर सत्कार समारंभ, मोठा मारुती मंदिर ते कारेगाव रोड या रस्ते कामाचा शुभारंभ देशमुख हॉटेलसमोर होणार आहे.

