येणाऱ्या दिवसात सर्व जनता अडचणीतून बाहेर पडावी - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंद्रेश्वराला घातले साकडे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंद्रेश्वराच्या रथा साठी भरणे कुटुंबियाकडून ५ लाख रुपये तर कमानीसाठी २० लाख रुपये मंजूर करण्याची दिली ग्वाही.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहराचे ग्रामदैवत इंद्रेश्वरच्या यात्रेला आज दि. २७ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला असून यात्रेनिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंद्रेश्वर आजचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या हस्ते इंद्रेश्वराची आरती करण्यात आली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दर्शन घेताना कोरोनामुळे सर्व जनतेला अडचणीचे दिवस गेले. येणाऱ्या दिवसात सर्व जनता अडचणीतून बाहेर पडावी असे साकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंद्रेश्वराला घातले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, या आठवड्यातच इंद्रेशवराच्या कमानीच्या कामासाठी वीस लाख रुपये मंजुर देता येईल. भांडण बाजूला ठेवून सर्वांना एकत्र घेऊन आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. इंद्रेश्वर देवस्थानाच्या यात्रेमध्ये वापरण्यात येणारा रथ हा सुंदर आकर्षक बनवण्याचा मानस असल्याचे यानिमित्ताने समोर आले .मात्र राज्य सरकारचा निधी याकरिता देता येत नसल्याने मी स्वतःहून भरणे कुटुंबियांच्या वतीने पाच लाख रुपयांची देणगी याठिकाणी देत असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी जाहीर केले.
आपल्याकडे विकास कामासाठी निधी भरपूर आहे. इंद्रेश्वरायांच्या नावाला शोभेल असं सुंदर व देखणे काम भविष्यकाळात येथे केले जाईल असे सांगत शहराचा आराखडा करताना सर्व बाबींचा विचार केला जाईल अशी ग्वाही भरणे यांनी दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, ट्रस्टी राजेंद्र वाशिंबेकर, अशोक घोडके, देवराज दीक्षित, राष्ट्रवादी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे, अमर गाडे, गजानन गवळी, अतुल शेटे पाटील, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, वसंतराव मालुंजकर, महेंद्र बनकर, संदीप वाशिंबेकर, धीरज शहा, राकेश शुक्ल, निमेश सोनी, अमित जोंजाल, पुजारी श्रीकांत गुरव यासह विविध आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

