shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निवडणूक संपली आता मतभेद विसरून कामे करा - रमेश आडसकर.. एकत्र आल्यामुळें केज शहराच्या विकासाला चालना मिळणार-हारून इनामदार..!!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-

केज येथील नगर पंचायत च्या नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सिता बनसोड  व उपनगराध्यक्ष सौ शितल दांगट यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मंचावर रमेश आडसकर , अंकुश इंगळे , हारुण इनामदार , मनिषा तोकले , दिलीप गुळभिले , आदित्य पाटील , राहुल सोनवणे , पशुपतीनाथ दांगट ,सुग्रीव कराड, कविता कराड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलताना सर्व मान्यवरांनी केज चा विकास करण्याची ग्वाही दिली. अध्यक्ष सिता बनसोड या भावुक झाल्या व केज च्या मातीला वंदन करून उतणार नाही मातणार नाही सेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही असा केज च्या नागरिकांना विश्वास दिला. 

दोन वर्षाच्या नंतर नगर पंचायत ला अध्यक्ष व उपाध्यक्ष  मिळाले असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते . अध्यक्ष सिता बनसोड व उपाध्यक्ष शितल दांगट या दोन्ही वेगवेगळ्या पध्दतीने निवडणूक लढल्यानंतर झालेल्या त्रिशंकु स्थिती तून मार्ग काढत अंकुशराव इंगळे व रमेशराव आडसकर यांच्या राजकीय सामंजस्य मधून आपले गाव आपले सरकार या संकल्पना चा जन्म झाला व जनविकास परिवर्तन आघाडी व राष्ट्रीय कॉग्रेस दोघांची आघाडी झाली व स्वाभीमानी संघटना च्या रांजनकर ही आघाडीत सहभागी झाल्याने संख्यात्मक दृष्टीने मजबुती आली व बिनविरोध पणे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड झाली . शुक्रवार १८ रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताना सर्वानी एकदिलानै काम करण्याचे आश्वासन दिले . 

 परिवर्तन आघाडी व राष्ट्रिय काॅंग्रेस एकत्र आल्याने केज शहरात निश्चित विकास होईल - हारुण इनामदार
जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारुण इनामदार यांनी प्रास्तविक मधे बोलताना सांगितले कृषी विभागाच्या जागेचा प्रश्न लवकर सोडविला जाईल , रस्ते , नाल्या , पाणी आदी प्रश्न लवकर सोडविण्यासाठी एकत्र पणे सोडवु असे आश्वासन दिले 

प्रस्ताव बनवा मुंबई दिल्ली मधे रजनीताई निश्चित मदत करतील - आदित्य पाटील
माजी नगर अध्यक्ष आदित्य पाटील यांनी बोलताना सांगितले की आपण केज च्या विकासासाठी नेहमीच तयार असतो खा. रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून जी मदत लागेल ती निश्चित पणे करतील . 

त्रिशंकु निर्माण झालेल्या परिस्थिती मधून मार्ग काढताना विकासाचा विचार केला - अंकुश इंगळे  
या निवडणूकीत नागरिकांनी त्रिशंकु जनादेश दिला या परिस्थिती मधून मार्ग काढण्यासाठी विचार करत असताना जनविकास परिवर्तन आघाडी व राष्ट्रीय कॉग्रेस च्या आघाडीसाठी बोलणी करताना विविध विषयाचा विचार करण्यात आला व एकत्र येऊन शहराचा विकास साध्य करता येऊ शकतो हा विचार करून च आघाडी केली .  

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही - सिता बनसोड  मागील वीस वर्षापासून रस्त्यावर उतरुन समाजसेवा केली आहे , राजकीय जिवनात पहिली संधी आडसकर साहेबांनी दिली ग्रामपंचायत सदस्य पदासाठी व हारुण इनामदार यांनी नगर अध्यक्ष पदाचा सन्मान दिला . शहराच्या विकासासाठी निश्चित काम करेल असा विश्वास दिला यावेळी बोलताना सिता बनसोड भावूक झाल्या व सर्वाचे आभार मानून केज च्या मातीला वंदन केले . 

मागील काळात सुरू केलेल्या योजना लवकरच पुर्ण होतील - शितल दांगट  
मागील सत्ता राष्ट्रीय कॉग्रेस च्या काळात शहराच्या विकासाच्या योजना राबविलेल्या आहेत ज्या आता लवकरच त्या पुर्ण होतील व खा. रजनीताईच्या माध्यमातून शहराचा विकास होईल असा विश्वास व्यक्त केला . शितल दांगट या बोलण्यासाठी उभारल्या तेव्हा मुस्लिम बांधवाची प्रार्थना सुरू झाली म्हणून थोड्या वेळ त्या न बोलता शांत  उभ्या राहिल्या . 

निवडणूक संपली आता मतभेद विसरून विकास कामे करा - रमेश आडसकर
निवडणूक मधे जय पराजय हा असतोच याला सर्वानी खिलाडू वृत्तीने स्विकारले पाहिजे व जय पराजय विसरून सगळ्यांना सोबत घेऊन काम केले पाहिजे . नगर पंचायत मधे निवडून आलेल्या सर्व नगर सेवकांना सोबत घ्या व काम करा निवडणूक मधे पराभुत झालेल्या दोन्ही कडील उमेदवारानी आपल्या मनातून आडी काढून एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे राजकारणात हे स्विकारता आले तरच राजकारणात काम केले पाहिजे असे रमेश आडसकर यांनी पदग्रहण समारंभावेळी  वेळी सांगितले. 

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या  नगरसेवकानी दांडी मारली त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पदग्रहणाला उपस्थित रहायला पाहिजे होते  असी केजच्या  नागरिकात चर्चा होती .
close