शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२
आजी,माजी सैनिकांसह श्रीरामपूर फोडतयं टाहो ! शहीद स्मारकास शहरात जागा मिळेल काहो ?..!!
पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना मानवंदना; श्रीरामपुरात शहीद स्मारकाला जागा मिळेल का ? - सैनिकांसह शहरवासियांचा सवाल..
श्रीरामपुर : शहरातील बेलापूर नाका येथे तालुक्यातील आजी- माजी सैनिक तसेच नागरिकांनी एकत्र येऊन पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद वीर जवानांना मानवंदना दिली. यावेळी त्रिदल सैनिक संघाचे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख मेजर कृष्णा सरदार म्हणाले की शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी आम्ही कुठे जावे ? कारण श्रीरामपूर शहरात एक छोटीशी का होईना जागा पालिकेच्या माध्यमातून मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून शहीद स्मारकास जागा उपलब्ध झाल्यास शहरातील नागरिकांना भावी जवानांना देखील एक ऊर्जेचे स्थान निर्माण होईल. आम्ही सातत्याने शहीद जवानांच्या स्मारकासाठी प्रयत्न करत आहोत शहीद स्मारकासाठी जागा इतर स्मारकासाठी असलेली लगेच दर्शवली जाते असे ते म्हणाले.
यावेळी भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख म्हणाले की, देशाचे रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मारकासाठी श्रीरामपूर शहरामध्ये जागा उपलब्ध होत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब असून यात तात्काळ निर्णय न घेतल्यास प्रसंगी मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांनीही स्मारकाची उभारणी करणेसाठी मनोगत व्यक्त केले. जनसमुदायाचे वतीने शहीद जवानांना अभिवादन करून मानवंदना दिली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या लहान मुलांनी देखील जय जवान- जय किसान, जय हिंद, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा दिल्या. यानंतर मागणी असलेल्या शहीद स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी शहीद जवानांना अभिवादन करत प्रत्येकाने मेणबत्ती व दिपज्योत लावत. रस्तावरील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनीही त्या ठिकाणी थांबून शहीद जवानांना मानवंदना दिली. प्रसंगी आजी- माजी सैनिक, भावी सैनिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार मेजर कृष्णा सरदार यांनी मानले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

