शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२
डी पॉल हायस्कूल वावरथचे मुख्याध्यापक श्री. नंदकुमार कुटे सर यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार..!!
राहुरी : डी पॉल हायस्कूल वावरथचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. नंदकुमार कुटे सर यांना राहुरी पंचायत समितीचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे आत्ता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वितरण होत आहे.
अतिशय विनम्र स्वभाव आणि कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे कुटे सरांचे व्यक्तीमत्व प्रेमळ आहे. सरांच्या प्रेमळ स्वभावाचा परिचय शाळा भेटीच्या वेळी जाणवला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत असणारे कुटे सर यांना आज पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. सर आपल्या कार्याचा सार्थ अभिमान आहे.
आपले मनापासून अभिनंदन..!!!!!!
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

