shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एका बेवारस वृध्दाला आश्रमात भरती करुन दिले जीवदान ..!

औरंगाबाद . सतिश लोखंडे ,
साक्री बायपास  हिरे मेडीकल धुळेच्या बाहेरील बाजूस  एक बेवारस इसम भुकेने व्याकूळ झालेल्या अवस्थेत पडून होता. अचानक समाजसेविका श्रीमती भाग्यश्री कुलकर्णी,व मुक्ता आदिवासी महिला बहूउदेशिय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मोनिका ताई शिंपी व अभय पिंपळे यांनी सदर इसमाला मोराने जवळील कृष्टोरोग व अंपग वृध्द आश्रमात या  वृध्दाची भरती करुन यशस्वीपणे व्यवस्था केली.तरी सदर इसमाची काही दिवसांनी  भेटुन चौकशी व पाहणी केली असता त्याची तब्येत सुधारली असल्याचे निदर्शनास आले.तसेच  आश्रम शाळेचे श्री पाठक साहेब व संबंधित आश्रमशाळेतील परीवाराने चांगली काळजी घेऊन व्यवस्था केल्याचे दिसून आले.

याविषयी समाज सेविका भाग्यश्री अभय कुलकर्णी व मुक्ता आदिवासी महिला बहूउदेशिय संस्थेच्या अध्यक्षा मोनिका अशोक शिंपी व अभय पिंपळे यांनी समाधान व्यक्त केले.श्री पाठक यांनी आभार व्यक्त केले.तसेच समाजसेविका श्रीमती. भाग्यश्री अभय कुलकर्णी ,व मुक्ता आदिवासी महिला बहूउदेशिय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.मोनिका ताई शिंपी कपडे देऊन बिस्किटे वाटप केले.
close