पूर्णा । वार्ताहर :-
शेतीला दिवसा १० तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी गंगाखेड येथे नांदेड रोडवरील इटाळसी नदीच्या पूलाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी (दि.४) दुपारी एक तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा रस्त्याच्या दोन्ही बाजूने लागल्या होत्या.
शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कोल्हापूर येथे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे, विधानसभा अध्यक्ष जयवंत कुंडगिर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब टेकाळे आदींनी आपले विचार मांडले. मरडसगावचे जयदेव मिसे यांनी यावेळी स्वतःहून उपस्थित राहत शेतकर्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. अंकुश कोरडे, भगवान मात्रे, बाळासाहेब मुलगिर, दिगंबर रेबाळे, माधव कुंडगिर, माधव खोकले, गणपतराव शिंदे, प्रकाशराव शिंदे, मारुतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे प्रकाश जोशी आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

